स्टेट बँक ऑफ इंडियात नोकरभरती, भूमिपुत्रांनी अर्ज करण्याचे स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे आवाहन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
sbi-poster

स्टेट बँक ऑफ इंडियात ज्युनिअर असोसिएट्स पदाकरिता नोकरभरती होणार आहे. या नोकरभरतीमध्ये जास्तीत जास्त स्थानिक भुमिपुत्रांची भरती व्हावी म्हणून स्थानीय लोकाधिकार समिती महासंघ प्रयत्नशील असून इच्छुक उमेदवारांनी या भरतीकरिता www.sbi.co.in/careers या संकेतस्थळावर मंगळवार 27 सप्टेंबर 2022पूर्वी ऑनलाईन अर्ज करावा, असे आवाहन केले आहे.

नोकरभरतीसाठी अर्ज करणाऱया उमेदवाराचे वय 1 ऑगस्ट 2022पर्यंत सर्वसाधारण वर्गाकरिता 20 ते 28 वर्षांपर्यंत असावे. तसेच आरक्षित प्रवर्गाकरिता कमाल वयोमर्यादा शासकीय नियमानुसार सवलत, शिथिलता असेल. महाराष्ट्रात एकूण पदांची संख्या 747 असून जे उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर झाले असतील ते या परीक्षेकरिता अर्ज करू शकतात. परीक्षेसाठी अर्ज शुल्क सर्वसाधारण, ओबीसी, ईबीसी उमेदवारांकरिता 750 रुपये व एससी, एसटी, पीडब्ल्यूबीडी, ईएक्सएसएम उमेदवारांकरिता शुल्क माफ आहे. या पदासाठी पूर्व परीक्षा नोव्हेंबर 2022 रोजी संबंधित यंत्रणेद्वारे घेतली जाणार आहे.

महासंघाच्यावतीने प्रशिक्षण वर्ग

स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे अध्यक्ष, शिवसेना नेते, खासदार गजानन कीर्तिकर, सरचिटणीस, शिवसेना सचिव, खासदार अनिल देसाई यांच्या सूचनेनुसार सदर बँकेच्या नोकरभरतीपूर्व परीक्षेचे ऑनलाईन व ऑफलाईन प्रशिक्षण वर्ग महासंघाच्या वतीने घेण्यात येणार आहेत. अधिक महितीसाठी शिवसेना प्रणित स्थानीय लोकाधिकार समिती महासंघ कार्यालय, शिवसेना भवन, पहिला मजला, दादर (प.) येथे रविवार आणि सुट्टीचे दिवस वगळून सायंकाळी 6.30 ते रात्री 8.30 यावेळेत चिटणीस शरद एक्के 9892699215, श्रीराम विश्वासराव 9869588469, विलास जाधव 9619118999, सुधाकर नर 9867634856 यांच्याशी संपर्क साधावा, असे महासंघाचे चिटणीस व प्रशिक्षण वर्गप्रमुख उमेश नाईक यांनी कळवले आहे.