तुम्हाला माहिती आहे का,लाल आणि केशरी रंगाच्या गाजरांमध्ये फरक काय असतो ?

बाजारामध्ये भाज्या खरेदी करायला गेल्यानंतर आपल्याला दोन प्रकारची गाजरे पाहायला मिळतात. एक असतात लांबलचक आणि लाल रंगाची आणि दुसरी असतात की लहान, जाडसर आकाराची आणि केशरी रंगाची. याशिवाय पिवळी पांढरी, जांभळी आणि काळ्या रंगाचीही गाजरे आपल्याला काही ठिकाणी पाहायला मिळतात. गाजरांचा रंग जसा वेगळा असतो, तसा त्यांच्या चवीमध्येही थोडाफार फरक असतो. गाजरांमधील रंगांचा फरक हा त्यातील रंगद्रव्यांमुळे (PIGMENT) वेगळा दिसतो

लाल, केशरी सर रंग असलेल्या गाजरांमध्ये एक विशिष्ट रंगद्रव्य असतं, ज्याला कॅरेटीनॉईडस (CARETINOIDS) असं म्हटलं जातं. जांभळ्या गाजरामध्ये अँथोसिनिन (ANTHOCYNIN) नावाचं रंगद्रव्य. हेच रंगद्रव्य आपल्याला बीट आणि लाल कोबीमध्येही सापडतं. अशा भाज्यात आढळत. आपण मूळ मुद्दाकडे वळूयात. लाल रंगाची गाजरे ही बहुतांश करून हिंदुस्थानातच पिकवलेली असतात. तर केशरी रंगाची गाजरे ही विदेशातून आलेली असतात किंवा ती हायब्रीड पद्धतीने पिकवलेली असतात. आपण जी लाल गाजरं पाहातो ती ठराविक वेळीच बाजारात येतात, खासकरून हिवाळ्यामध्ये. या गाजरांसाठी एक विशिष्ट तापमान आणि हवामान गरजेचं असतं. या दोन घटकांमुळे गाजरातील रंगद्रव्यावर विशेष करून प्रभाव पडत असतो. केशरी रंगाची गाजरे ही बारमाही बाजारात उपलब्ध असल्याचं पाहायला मिळतं.

केशरी रंगाच्या गाजरामध्ये इतर रंगांच्या गाजरांपेक्षा चारपट व्हिटॅमिन्स असतात. यात बीटा कॅरोटीन नावाचं रंगद्रव्य असते. लाल रंगाच्या गाजरामध्ये लायकोपीन (LYCOPENE) कॅरेटीनॉईड जास्त असतं. असं म्हणतात की लायकोपीन कर्करोगाला दूर ठेवण्यास शरिराला मदत करतं. या संदर्भातील माहिती कोरा या प्रश्नोत्तराच्या मंचावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या