
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील पारध येथे योग्य ती खबरदारी घेतली आहे. असे असताना 26 एप्रिल रोजी रेड झोन मधून आलेल्या सात जणांनी कोणालाही न सागंता पारधमध्ये येऊन वास्तव्य केले. त्यामुळे या सातजणांविरुद्ध ग्रामविकास अधिकारी गजानन उबंरकर यांच्या फिर्यादीवरून पारध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
कोरोनाच्या विषाणूने संपूर्ण जगात थैमान घातले असताना पारध ग्रामपंचायत यावर उपाय योजना करण्यासाठी कबंर कसली असूली असून संपूर्ण गावात दोन हजार सॅनिटायझरचे वाटप केले व तबल तीन वेळा गावात जंतूनाशक फवारणी केली. रेड झोन मधून कोणीही पूर्वसूचना न देता गावात येण्यासाठी बंदी घातलेली असताना रविवारी दिलीप संपत काटोले, योगीराज शेषराव सरोदे, समाधान श्रीरंग क्षीरसागर, लता क्षीरसागर, आकाश क्षीरसागर, कासाबाई दौलत देशमुख, कमलबाई भिकनराव देशमुख यांना ते जेथे आहे तेथेच थांबण्याचे शासनाचे आदेश असताना असे असून सुद्धा ते रेड झोन मधून पारध येथे आले. तसेच त्यांनी ते आल्याची माहिती कोणालाही कळवली नाही. म्हणून ग्रामविकास अधिकारी गजानन उंबरकर यांच्या फिर्यादीवरून पारध पोलीस ठाण्यात या सात जणाविरूध्द गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस नाईक प्रकाश शिनकर हे करीत आहेत.























































