
शेतकऱयांचा कर्जमुक्तीचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. त्याप्रमाणे जे नियमित कर्जाच्या रकमेचे हप्ते भरतात अशा कर्जफेड करणाऱया शेतकऱयांना 25 हजारांपेक्षा अधिक रक्कम देण्यात येणार असल्याची माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली. सातारा येथील लोणंद बाजार तळावर राज्यस्तरीय शरद कृषी-औद्योगिक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी जयंत पाटील बोलत होते.

































































