रेखा जरे हत्याकांड : बाळ बोठेच्या जामीन अर्जावरील सुनावणी 16 सप्टेंबरला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रेखा जरे हत्याकांडातील मुख्य आरोपी असलेल्या बाळ बोठे याने तब्येतीचे कारण देत जामिनासाठी अर्ज केला आहे. आज त्यावर सुनावणी होणार होती मात्र सरकारी पक्षाच्या वतीने म्हणणे आज पण मांडले नसल्यामुळे येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश सुनील गोसावी यांनी पुढील सुनावणी दि 16 रोजी ठेवण्याचे आदेश दिले आहे.

शुक्रवारी (दि. 25) झालेल्या सुनावणीदरम्यान बोठेसह सहा आरोपींची नगरच्या न्यायालयात हजेर होते. त्यावेळेला दिनांक 2 रोजी सुनावणी होईल असे आदेश दिले होते त्यानुसार आज पण सर्व आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले होते.

रेखा जरे हत्याकांडात एकूण बारा आरोपी आहेत. यापैकी 11 आरोपींवर आरोप निश्चित करण्यात आले असून, एक महिला आरोपी फरार आहे.

बोठेसह सहा आरोपी नाशिकच्या कारागृहात असताना सुनावणीसाठी नगरच्या न्यायालयात प्रत्यक्ष हजर करण्यासाठी यातील दोन आरोपींनी अर्ज केला होता. न्यायालयाने अर्ज मान्य केल्यानंतर न्यायालयीन कोठडीत असलेल्या सहा आरोपींना नगरच्या सबजेलमध्ये हलविले. आज झालेल्या सुनावणीवेळी बाळ जगन्नाथ बोठे, ज्ञानेश्वर शिवाजी शिंदे, आदित्य सुधाकर चोळके, फिरोज राजू शेख, ऋषिकेश वसंत पवार, सागर उत्तम भिंगारदिवे या सहा आरोपींची उपस्थिती होते

सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड. उमेशचंद्र यादव पाटील बाजू मांडत आहेत. फिर्यादीतर्फे अ‍ॅड. सचिन पटेकर सहायक म्हणून काम पाहत आहेत. आज सरकारी पक्षाच्या वतीने मान्य साधरण केल्यामुळे पुढील सुनावणी दिनांक 16 सप्टेंबर रोजी ठेवले आहे