रेखा जरे हत्या प्रकरण- पत्रकार बाळ बोठे मुख्य आरोपी, जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या खुनाची सुपारी नगरमधील वरिष्ठ पत्रकार अॅड. बाळ ज. बोठे पाटील यांनी दिल्याचे उघडकीस आले असून, हेच या प्रकरणातील मुख्य आरोपी आहेत, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

बोठे फरार झाले असून, त्यांच्या शोधासाठी पोलिसांची पाच पथके रवाना करण्यात आली आहेत. दरम्यान, या घटनेमध्ये आतापर्यंत पाच आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. खुनामागील कारण काय हे मुख्य आरोपी बोठे यांना पकडल्यावर उघड होईल. बोठे यांच्या घराची झडती पोलिसांनी घेतली असून, काही वस्तू जप्त केल्या आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.