अजब प्रकरण! लठ्ठ असल्याने तुरुंगातून झाली सुटका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लठ्ठ असल्याचे दुष्परिणाम आपल्याला माहीत आहेत, पण लठ्ठपणाचा चक्क फायदा झाल्याचे अजब प्रकरण समोर आले आहे. एका आरोपीला लठ्ठपणामुळे जामीन मिळाला आहे.

मनी लाँडरिंगप्रकरणी एका आरोपीला मार्च 2022 मध्ये अटक झाली होती. आरोपीचे वजन 153 किलो आहे. लठ्ठ असल्याने पंजाब आणि हरयाणा हायकोर्टाने त्याला जामीन दिला आहे. आरोपी  लठ्ठ आहे. लठ्ठपणा हे सर्व आजारांचे मूळ कारण आहे, असे सांगत कोर्टाने हा निकाल दिला.

आरोपी प्रांजील बत्रा याने जामिनासाठी याचिका केली होती. वजनामुळे आपल्याला बऱयाच आरोग्याच्या समस्या आहेत. आपले आरोग्य दिवसेंदिवस बिघडत आहे आणि अशा परिस्थितीत त्यांचे आरोग्य आणखी ढासळू शकते, जे त्याच्या आयुष्यासाठी घातक ठरू शकते, असेही त्याने याचिकेत नमूद केले होते.