
रिलायन्स डिजिटलने 2 ते 17 एप्रिल या कालावधीत डिजिटल डिस्काउंट ऑफरची घोषणा केली आहे. त्यानुसार टीव्ही, स्मार्टफोन, लॅपटॉप, एसी, फ्रीज, वॉशिंग मशीन, स्मार्टवॉच आदी इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या खरेदीवर ग्राहकांना रिलायन्स डिजिटल स्टोअर आणि माय जिओ स्टोअरवर तसेच त्यांच्या संकेतस्थळावर भरघोस ऑफर्स मिळतील. याशिवाय एचडीएफसी कार्डने खरेदी केल्यास 7.5 टक्के इन्स्टंट डिस्काऊंट तसेच 80 हजारांहून अधिक खरेदीवर 2 हजार रुपयांचे कुपनदेखील मिळेल. या ऑफरमध्ये सॅमसंग गॅलेक्सी एस 22 प्लस 84,999 रुपयांपासून तर आयफोन-13 अवघ्या 61,900 रुपयांपासून उपलब्ध आहे. याशिवाय 55 इंचाचा यूएचडी टीव्ही केवळ 34, 990 रुपयांत खरेदी करता येईल. दरम्यान, गुढी पाडव्यानिमित्त रिलायन्स ज्वेल्सने 1 ते 4 एप्रिलला ग्राहकांसाठी आयोजित केलेल्या विशेष ऑफरलादेखील उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या ऑफर अंतर्गत सोन्याच्या दागिन्यांच्या घडणावळीवर आणि हिरेजडीत दागिन्यांवर 20 टक्क्यांची सूट दिली होती.



























































