
सामना ऑनलाईन । मुंबई
२५ कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आलेल्या एका प्रकरणात ईडीकडून नुकतेच पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आल्याने या प्रकरणात आता पुन्हा नव्याने जामिनाची प्रक्रिया पार पाडावी की कसे काय याबाबत विशेष न्यायालय येत्या ६ ऑगस्ट रोजी निकाल देणार असल्याने तोपर्यंत छगन भुजबळ यांच्यासह समीर आणि पंकज यांना न्यायालयाने दिलासा दिला आहे. भुजबळ यांची नाशिक येथील २५ कोटींची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे.

























































