दादरमध्ये हनुमान जन्मोत्सव सोहळा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हनुमान जयंतीनिमित्त दादरच्या बाल बजरंग वाडी येथील हनुमान मंदिराच्या वतीने धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 2 एप्रिल रोजी पहाटे 5 वाजता कीर्तनकार कृष्णा माळकर यांच्या कीर्तनाने या सोहळय़ाला सुरुवात होणार आहे. त्यानंतर अभिषेक, पूजा, हनुमान जन्मसोहळा, पालखी शोभायात्रा, आरती, सांज आरती अशा विविध कार्यक्रम पार पडणार आहेत. या धार्मिक कार्यक्रमाला भाविकांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन विश्वस्त मंडळाचे प्रकाश कारखानीस, अशोक सोमाणी, मधुसूदन बने, सुयोगी नाईक, दत्तात्रय पवार यांनी केले आहे.