असं झालं तर… दिवाळीत डायबिटिज रुग्णाची शुगर वाढली तर…

1 दिवाळी म्हटलं की, गोडधोड पदार्थ आले. मित्रमंडळी, नातेवाईकांच्या घरी गेल्यावर समोर गोड पदार्थ ठेवले जातात. बऱ्याच डायबिटिज रुग्णांना गोड पदार्थांचा मोह आवरत नाही.

2 गोड पदार्थ खाल्ल्याने डायबिटिज रुग्णांची शुगर वाढते. त्यामुळे दिवाळीच्या सणासुदीत शुगर कंट्रोलमध्ये ठेवणे आवश्यक आहे. दिवाळीत शुगर वाढल्यास भरपूर पाणी प्या.

3 नियमित व्यायाम करा. डॉक्टरांनी दिलेली औषधे वेळेवर घेणे आवश्यक आहे. गोड पदार्थ आणि साखरयुक्त पेये टाळा. दररोज किमान 30 मिनिटे चालणे सुरू ठेवा.

4 आहारात बदल करा. फायबरयुक्त पदार्थ म्हणजेच भाज्या, फळे, डाळी खा. एकाच वेळी जास्त खाऊ नका. थोडे थोडे करून खा. दिवसभरात पुरेशी झोप घ्या.

5 नातेवाईकांच्या घरी गेल्यावर गोड फराळाला निसंकोचपणे नाही म्हणा. शुगर वाढेल असे कोणतेही पदार्थ खाणे टाळा. रक्तातील साखर जास्त वाढली असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.