गुळाचा चहा न फाटण्यासाठी… हे करून पहा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

n अनेकांना गुळाचा चहा आवडतो. मात्र, गुळाचा चहा बनवताना दूध फाटण्याची तक्रार अनेक जण करतात.

n दूध फाटू नये यासाठी गुळाचा चहा बनवताना कोमट दूध वापरावे किंवा त्याचे तापमान योग्य असावे. एकदम थंड दूध चहामध्ये टाकू नये. गुळात काही प्रमाणात खनिज आणि नैसर्गिक आम्लता असते. उकळत्या चहात थेट थंड दूध घातल्यास तापमानातील बदल आणि गुळातील आम्लतेमुळे दूध फाटण्याची शक्यता असते.

n चहा करताना गूळ पूर्णपणे विरघळल्यानंतरच चहात कोमट दूध घालावे. त्यानंतर चवीनुसार आले, वेलची, दालचिनी इत्यादी चहात घालावे.