रेणुका शहाणे पुन्हा सूत्रसंचालकाच्या भूमिकेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दूरदर्शनवरील ‘सुरभी’ या कार्यक्रमात अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी केलेले दमदार सूत्रसंचालन आजही प्रेक्षक विसरू शकलेले नाहीत. बऱयाच वर्षांनंतर रेणुका शहाणे आता पुन्हा एकदा सूत्रसंचालनाची धुरा सांभाळताना दिसणार आहेत. ‘झी मराठी’वर लवकरच ‘बँडबाजा वरात’ हा शो सुरू होणार आहे. या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा रेणुका शहाणे यांच्यासह ‘दिल दोस्ती दुनियादारी’ फेम अभिनेता पुष्कराज चिरपूटकर सांभाळणार आहे. या कार्यक्रमातून लग्नघरातील नववधू-वरांना ‘झी मराठी’कडून भरघोस आहेर मिळणार आहे. येत्या 18 मार्चपासून हा कार्यक्रम शुक्रवार आणि शनिवारी रात्री 9.30 वाजता प्रसारित होणार आहे.