
अनेकदा पती-पत्नीत कलह निर्माण होतो. हे वाद टोकाला जाऊन एकमेकांना आत्महत्या करण्याच्या धमक्या दिल्या जातात. वारंवारच्या या धमक्यांमुळे एकमेकांसोबत जीवन जगणे कठीण होऊन बसते. जोडीदाराकडून जीवन संपवण्याची देण्यात येणारी धमकी ही क्रूरताच असल्याचे स्पष्ट करत मुंबई उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्या पतीचा नुकताच घटस्पह्ट मंजूर केला.
याचिकाकर्त्या पुरुषाचे 2006 साली लग्न झाले, परंतु भांडणामुळे तो आणि त्याची पत्नी 2012 पासून वेगळे राहत आहेत. पत्नी अनेकदा घरातून पळून गेली तसेच ती आपल्या चारित्र्यावर संशय घेते आणि आत्महत्या करण्याची धमकी देते. इतकेच काय तर तिने आत्महत्येचा प्रयत्नदेखील केला आहे. त्यामुळे पत्नीपासून वेगळे व्हायचे असून घटस्फोट हवा म्हणून याचिकाकर्त्या पतीने कुटुंब न्यायालयात अर्ज केला केला होता.
न्यायालयाचे निरीक्षण काय
विवाहसंबंध पूर्णपणे तुटलेला आहे अशा वेळी विवाहाला पुढे चालू ठेवणे म्हणजे दोन्ही पक्षांवर क्रूरता लादण्यासारखे आहे. अपीलकर्त्याने पहिल्या विवाहखेरीज दुसरा विवाह केला आहे आणि त्याला एक मुलगीदेखील आहे, ज्यामुळे पहिल्या पत्नीसह आता सहजीवन पुन्हा सुरू करणे अशक्य आहे.


























































