
प्रजासत्ताक दिनी देशाचा राष्ट्रध्वज घेवून तब्बल 72 किलोमीटर अंतर अवघ्या 9 तास 28 मिनीटात धावण्याचा अनोखा विक्रमकॉलेज युवती व धावपटू आसमा अजमल कुरणे हिने केला आहे. त्यांच्या या विक्रमाची नोंद इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये’ झाली आहे.
ताराराणी विद्यापीठाच्या कमला कॉलेजमध्ये कला शाखेच्या तिसऱ्या वर्गात आसमा शिक्षण घेत असुन प्रतिकुल परिस्थितीतुन ती एक उत्कृष्ट धावपटू म्हणून पुढे येत आहे. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून,काल मंगळवारी तीने देशाचा राष्ट्रध्वज घेऊन,कोल्हापूर ते जयसिंगपूर आणि तेथून परत कोल्हापूर मार्गावर धावण्याचा विक्रम करुन,सर्वांचे लक्ष वेधून घेतले.सकाळी 6 वाजता कमला कॉलेजच्या प्रांगणातून तिने धावण्यास सुरुवात केली.प्राचार्य क्रांतीकुमार पाटील यांच्या हस्ते ध्वज दाखवून उपक्रमाची सुरुवात झाली. पहाटेची थंडी,वारा आणि दुपारचे कडकडीत ऊन कशाचीही पर्वा न करता,आसमा धावत होती. निश्चित मार्गावरुन सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास तिचे आगमन कमला कॉलेजच्या प्रांगणात होताच जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी
वास्तविक 72 किलोमिटर आंतर धावण्यासाठी सर्व सामान्यपणे 14 तास लागतात.आसमाने हे अंतर 10 तासांत धावण्याचा निर्धार केला होता. प्रत्यक्षात मात्र तिने हे अंतर अवघ्या 9 तास 28 मिनीटांत पूर्ण करून ‘ इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये’ आपले नाव नोंदविले.यावेळी एस.एन.पवार,प्राजक्ता पाटील,प्राचार्या तेजस्विनी मुडेकर,प्रा.सुजय पाटील,प्रा.ज्योती गावडे,प्रा. अनिल घस्ते,एस.के मासाळ,शाहिर आझाद नायकवडी,क्रीडाशिक्षक रघु पाटील यांच्यासह विद्यार्थीनी,खेळाडू उपस्थित होते.























































