एनडीए आज राष्ट्रपतींकडे सत्तास्थापनेचा दावा करणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

लोकसभा निवडणुकीमध्ये ऐतिहासिक संख्याबळ मिळवल्यानंतर एनडीए आज शनिवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे सत्तास्थापनेचा दावा करणार आहेत. सायंकाळी सात वाजता राष्ट्रपती एनडीएच्या नेत्यांना सरकार स्थापन करण्याचे निमंत्रण देण्याची शक्यता आहे. सत्तास्थापनेचा दावा केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रसारमाध्यमांशीही संवाद साधतील.

लोकसभा निवडणुकीमध्ये एनडीएने 352 जागा मिळवल्या. एकट्या भाजपने बहुमताचा आकडा पार करत ऐतिहासिक 303 जागा मिळवल्या. शुक्रवारी पंतप्रधान मोदींनी राष्ट्रपतींची भेट घेतली आणि आपला राजीनामा सोपवला. यानंतर मोदी 30 मे रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेण्याची शक्यता वर्तवण्यात आली. शनिवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी 16 वी लोकसभा भंग केली. त्यामुळे आजच मोदी सत्तास्थापनेचा दावा करतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.