
स्किल इंडियाने डिरेक्टोरेट जनरल ऑफ ट्रेनिंग (डीजीटी) व नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (एनएसडीसी) यांच्या सहयोगाने देशभरातील 660 हून अधिक ठिकाणी ऍप्रेन्टिसशिप मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांतर्गत 51 हजार 991 प्रशिक्षणार्थींना नियुक्त करण्यात आले आणि इव्हेंटमध्ये ऊर्जा, रिटेल, दूरसंचार, आयटी/आयटीईएस, इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोटिव्ह अशा 30 हून अधिक विभागांमध्ये कार्यरत असलेल्या 5060 हून अधिक कंपन्यांनी सहभाग घेतला. तसेच महत्त्वाकांक्षी तरुणांना सामावून घेत वेल्डर, इलेक्ट्रिशियन, हाऊसकिपर, ब्युटिशियन, मेकॅनिक अशा 500 हून अधिक ट्रेडस्मधून (डेसिग्नेटेड व ऑप्शनल) निवड करण्याची संधी मिळाली.




























































