पूर्व विदर्भ शिवसेना संपर्कप्रमुखांची मुंबईत आढावा बैठक

पूर्व विदर्भातील पाच लोकसभा मतदारसंघातील संपर्कप्रमुखांची बैठक पूर्व विदर्भाचे संपर्क नेते आणि शिवसेना उपनेते भास्कर जाधव यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील शिवालय या शिवसेना संपर्क कार्यालयात आज झाली. यावेळी पूर्व विदर्भातील 28 विधानसभा मतदारसंघातील आढावा बैठकीत घेण्यात आला.

शिवालय येथे झालेल्या बैठकीला पूर्व विदर्भातील जिल्हा संपर्कप्रमुख आणि विधानसभा संपर्कप्रमुख उपस्थित होते. यावेळी प्रत्येकाकडून आपापल्या मतदारसंघातील बलस्थाने तसेच उणिवा ठरू शकतील, अशा बाबींवर तसेच तळागाळापर्यंत पक्ष पोहोचवण्यासाठी सविस्तर चर्चा करण्यात आली. 28 विधानसभा मतदारसंघाच्या सर्व जागा पक्षाने लढवाव्यात, अशी मागणी उपस्थित संपर्कप्रमुखांनी केली. दरम्यान, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना मतदारसंघात जाऊन जनसंपर्क अधिक मजबूत करून पक्ष वाढीवर भर द्यावा, असे मार्गदर्शन पूर्व विदर्भ संपर्क नेते भास्कर जाधव यांनी केले. यावेळी पूर्व विदर्भ समन्वयक प्रकाश वाघ, जिल्हाप्रमुख बळीराम राऊत, प्रशांत कदम, महेश केदारी, प्रदीप खोपडे, अजय रजपूत आणि विधानसभा संपर्कप्रमुख गिरीश विचारे, राजेंद्र पगारे, आशीर्वाद सावंत, दिनेश रहाटे, महेंद्र पाटील, रमेश कांबळे, नरेश माळवे, अशोक सकपाळ, प्रभू भोसले, शिवाजी झोरे, बाळा परब, अविनाश, महेंद्र पवार आदी उपस्थित होते.