फक्त ३००० रुपयांत मिळणार ‘हे’ पाच स्मार्टफोन 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
हल्ली मोबाईल म्हटलं की तो स्मार्ट असलाच पाहिजे असे झाले आहे. सॅमसंग, विवो, ओप्पो अशा कंपन्यांचे स्मार्टफोन घेणे म्हणजे खिशाला मोठा फटकाच बसतो. पण जरा खिसा सांभाळून कमी किमतीत चांगला स्मार्टफोन घ्यायचा असेल तर मग हे काही ऑप्शन्स तुमच्यासाठी नक्कीच फायद्याचे ठरतील. मायक्रोमॅक्स, कार्बन, स्वाईप अशा काळाच्या ओघात मागे पडलेल्या काही मोबाईल कंपन्यांना स्मार्टफोनच्या दुनियेत तग धरून ठेवण्यासाठी स्वस्त पण मस्त असे मोबाईल फोन बाजारात आणले आहेत.
१) मायक्रोमाक्स इंडिया २ अल्ट्रा (Micromax India 2 Ultra)
bharat-2-mob
या मोबाईलमध्ये ४ इंचाचा डिस्प्ले दिला असून १३०० एमएचची बॅटरी दिलेलीआहे. तसंच या फोनची स्टोरेज क्षमता ४  जीबी आहे. हा मोबाईल खरेदीसाठी तुम्हाला अवघे २,८९९ रुपये खर्च करावे लागणार आहेत.  या फोनमध्ये २ मेगापिक्सल बॅक कॅमेरा व सेल्फिकॅमेरा ०.३ पिक्सलचा असणार आहे.
२) कार्बन ए४० इंडियन (Karbonn A40 Indian)
karbon-a40
 ४ इंचाचा डिस्प्ले व ४ जीबी स्टोरेज असलेल्या कार्बन ए४० इंडियन हा स्मार्टफोन तरुणांसाठी एक चांगला ऑप्शन आहे.या फोनमध्ये २ मेगापिक्सल बॅक कॅमेरा व सेल्फिकरता ०.३ मेगापिक्सल कॅमेरा दिला आहे. तसंच स्मार्टफोनची किंमत २,७४८ रुपये असून मोबाईलच्या बॅटरीची क्षमता १४०० एमएच आहे.
३) जीवी एनर्जी ई३ (Jivi Energy E3)
jivi-energy-e3
जीवी एनर्जी ई३ची किंमत फक्त २,६८७ रुपये आहे. या मोबाईलच्या बॅटरीची क्षमता १८०० एमएचची असून४ जीबी स्टोरेज आहे. तसंच या स्मार्टफोनचा डिस्प्ले ४ इंचाचा असणार आहे.जीवी एनर्जी ई३  स्मार्टफोमनचा फ्रंट कॅमेरा ५ मेगापिक्सल व बॅक कॅमेरा २ मेगापिक्सल देण्यात आला आहे.
४) कार्बन ए१ इंडियन (Karbonn A1 Indian)
karbon-a1-india
कार्बन ए१ इंडियन या स्मार्टफोनमध्ये ८ जीबी स्टोरेज असून ४ इंचाचा डिस्प्ले दिलेला आहे. या स्मार्टफोनच्या बॅटरीची क्षमता १५०० एमएच असून तो आता फक्त २,९२८ रुपयांत मिळणार आहे. तसचं या फोनला ३.२ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा व २ मेगापिक्सल बॅक कॅमेरा दिला आहे.
५) स्वाईप कनेक्ट स्टार (Swipe Konnect Star)
swipe-connect-star
स्वाईप कनेक्ट स्टार या स्मार्टफोनमध्ये १६ जीबी स्टोरेज असून ४ इंचाचा डिस्प्ले दिलेला आहे. या स्माफोनच्या बॅटरीची क्षमता १८०० एमएच असून तो २.९६० रुपयांत विकत घेऊ शकतो. कनेक्ट स्टारच्या या स्मार्टफोनला ५ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा व १.३ मेगापिक्सल बॅक कॅमेरा दिलेला आहे.