
ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलियाने पॅलेस्टाईनला स्वतंत्र राज्य म्हणून मान्यता दिल्याने जगभरातील वातावरण ढवळून निघाले आहे. या तीन देशांचा हा निर्णय म्हणजे दहशतवादाला बक्षीस देण्यासारखे आहे. यावर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी रविवारी ब्रिटन, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियाला सज्जड इशारा दिला आहे. पॅलेस्टिनी राज्य नकाशावर दिसणार नाही. आमच्या भूमीच्या मध्यभागी एक दहशतवादी राज्य आमच्यावर लादण्याच्या प्रयत्नांना अमेरिकेतून परतल्यानंतर उत्तर देण्यात येईल. आमच्या देशात दहशतवादी राज्य लादण्याचे सर्व प्रयत्न हाणून पाडू, असा इशारा नेत्यानाहू यांनी दिला आहे.
इस्रायल-हमास संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ब्रिटन, कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया या तीन देशांनी पॅलेस्टाईन राज्याला मान्यता दिल्यानंतर इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी रविवारी ब्रिटन, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियाला इशारा दिला. जगाच्या नकाशावर जॉर्डन नदीच्या पश्चिमेला पॅलेस्टिनी राज्य दिसणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे. एका निवेदनात नेतन्याहू म्हणाले की, जगाच्या नकाशावर पॅलेस्टिनी राज्य दिसणार नाही. आमच्या भूमीच्या मध्यभागी एक दहशतवादी राज्य आमच्यावर लादण्याच्या प्रयत्नांना आपण अमेरिकेतून परतल्यानंतर उत्तर देऊ. आमच्यावर दहशतवादी राज्य लादण्याचा प्रयत्न हाणून पाडण्यात येईल, असे ते म्हणाले.
पॅलेस्टिनी राज्याला मान्यता देणाऱ्या नेत्यांना माझा स्पष्ट इशारा आहे की, तुम्ही दहशतवादाला मोठे बक्षीस देत आहात. मात्र, ते कदापी शक्य होणार नाही. जॉर्डन नदीच्या पश्चिमेला कोणतेही पॅलेस्टिनी राज्य राहणार नाही, असा इशाराच त्यांनी दिला आहे. पॅलेस्टिनी राज्यला त्यांनी तीव्र विरोध केला आहे. पश्चिम किनाऱ्यावर इस्रायली वसाहतींचा विस्तार सुरू ठेवण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. वर्षानुवर्षे, मी देशांतर्गत आणि परदेशातून येणाऱ्या प्रचंड दबावाला तोंड देत, त्या दहशतवादी राज्याची निर्मिती रोखली आहे. आम्ही हे दृढनिश्चयाने हे केले आहे. आम्ही ज्यूडिया आणि सामरियामध्ये ज्यू वसाहती दुप्पट केल्या आहेत आणि आम्ही या मार्गाने पुढे जातणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ब्रिटन, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियाने पॅलेस्टिनी राज्याला औपचारिक मान्यता दिली. त्यामुळे इतर राष्ट्रांमध्ये सामील होऊन दोन-राज्य उपायासाठी गती पुनरुज्जीवित करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला, परंतु इस्रायल आणि अमेरिकेने त्यावर टीका केली आहे. एक्सवरील एका पोस्टमध्ये, ब्रिटनचे पंतप्रधान केयर स्टारमर यांनी म्हटले आहे की, आज, पॅलेस्टिनी आणि इस्रायलींसाठी शांतीची आशा आणि दोन-राज्य उपाय पुनरुज्जीवित करण्यासाठी, युनायटेड किंग्डम औपचारिकपणे पॅलेस्टाइन राज्याला मान्यता देत आहे, असे त्यांनी म्हटले आहे.