इश शेहेर में रेहना है तो तुझे पर्दे पे बिकना होगा, पाहा अडल्ट स्टार शकीलावरील चित्रपटाचा ट्रेलर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘इश शेहेर मैं रेहेना है तो तुझे पर्दे पे बिकना होगा’, हा बोल्ड डायलॉग आहे. 2000 च्या दशकातील अडल्ट सुपरस्टार शकीला हिच्या जीवनावरील चित्रपटातील. या चित्रपटाचा ट्रेलर आज सर्वत्र प्रदर्शित झाला आहे.

शकीला या चित्रपटात रिचा चढ्ढा मुख्य भुमिकेत असून पंकज त्रिपाठी याने दक्षिणेकडील सुपरस्टारची भुमिका केली आहे. अडल्ट स्टार सिल्क स्मिताने दक्षिणेकडील चित्रपटसृष्टीवर राज्य केलं होतं. तिच्या आत्महत्येनंतर आता तिची जागा कोण घेणार अशी चर्चा सुरू असतानाच शकीलाची चित्रपटसृष्टीत एन्ट्री झाली. शकीलाने देखील तिच्या कातिल अदांनी बी ग्रेड सिनेमे हादरवून टाकले होते.

शकीला ही नेल्लोरमधील एका सामान्य मुस्लीम कुटुंबात जन्मली होती. शकीलाच्या वडिलांच्या मृत्युनंतर तिची आई चांद बेगम तिला व तिच्या सहा भावंडांना घेऊन चेन्नई येथे आली होती.  शकिला हिने 1995 ला प्लेगर्ल या सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. त्यानंतर 1995 ते 2002 पर्यंत ती ब्री ग्रेड चित्रपटसृष्टीतील सेक्स सिम्बॉल म्हणून ओळखली जात होती. तिने 250 हून अधिक सिनेमात काम केले आहे.