भात कोणत्या वेळी खायला हवा? दुपारी की रात्री, वाचा सविस्तर 

आपल्या आहारामध्ये सर्व प्रकारचे अन्नपदार्थ असतात. यामध्ये प्रामुख्याने चपाती, भाकरी आणि भात हे पदार्थ आहेत. चपाती भाकरीपेक्षा अनेकांना भात खाणे हे अधिक आवडते. परंतु भात खाताना मात्र अनेकदा हा प्रश्न पडतो की, भात खाण्याची नेमकी वेळ कोणती?  भातप्रेमींसाठी अनेकदा भात खाऊ नको हे सांगणे म्हणजे गुन्हा ठरतो. त्यामुळेच आपण आरोग्याच्या दृष्टीने भात खाण्याची योग्य वेळ कोणती हे बघुया.

दिवसभर उर्जावान राहण्यासाठी आहारात ‘हा’ पदार्थ समाविष्ट करायलाच हवा, वाचा

भात हा आपल्या जेवणातला महत्तवाचा भाग आहे. डाळ , भाजी , कढी , वरण , व्हेज – नॅानव्हेज इ.सोबत भात आपण चवीने खातो. भातामध्ये कार्बोहाइड्रेट, प्रोटीन , फायबर चे भरपूर प्रमाणात असतं. भात हा पोटभरीसाठी सर्वात उत्तम पर्याय आहे. परंतु भात अवेळी खाल्ला तर, तो आपल्या शरीराचं नुकसानही करु शकतो. त्यामुळे भात खाण्याची योग्य वेळ ही माहीत असायला हवी.

भातामुळे वजन फक्त वाढतच नाही तर वजन कमी सुद्धा होते.

Skin Care – उत्तम त्वचेसाठी आपल्या आहारात हे पदार्थ समाविष्ट करायलाच हवेत, वाचा

भात हा पचायला हलका असून त्यात कार्ब्स, मिनिरल्स, मॅग्नेशिअम सारखे तत्व असतात जे मांसपेशींना मजबूत करतात आणि कार्बोहाइड्रेट्स शरीराला एनर्जी देतात.

बहुतेक डायटीशियन दुपारी भात खाणे योग्य आहे हेच सुचवतात.

शक्यतो थंडी मध्ये भात खाणे टाळले पाहिजे.

डोळ्याखालील काळी वर्तुळे आता होतील गायब, फक्त दिवसातून दोनदा हा उपाय करुन बघा

थंडीत अति प्रमाणात भात खाल्ल्यामुळे कफ होतो. यामुळे आपल्या शरीरात वाताचे प्रमाण वाढते.

पॅालिश भातामध्ये विटामीन B- 12 कमी असल्याने अनपॅालिश भात खायला चांगला असतो.

पोटात थंडावा यावा म्हणून आपण दहीभात खातो. पण हा असा भात खाणे शरीराला हानिकारक आहे. असे आयुर्वेदातही म्हटले आहे.

मधुमेह असणाऱ्यांसाठी पांढऱ्या भातापेक्षा लाल भात खाणे हे अधिक हितकारक आहे.