
मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री रिंकू राजगुरु पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. रिंकूचा नवा चित्रपट ‘आशा’ लवकरच चित्रपटगृहात दाखल होणार आहे. याआधी रिंकूने मराठी सिनेसृष्टीसोबतच हिंदी आणि कन्नड चित्रपटात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. नुकत्याच सोशल मिडियावर रिंकूने फोटो शेअर केले आहेत. यामध्ये रिंकू अगदी साध्या रुपात दिसत आहे.