
अॅण्डरस-तेंडुलकर या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत खेळत असताना चौथ्या कसोटीमध्ये टीम इंडियाचा विस्फोटक फलंदाज आणि यष्टीरक्षक ऋषभ पंतला गंभीर दुखापत झाली होती. लंगडत का होईने त्याने तेव्हा फलंदाजी केली, परंतु तो पुन्हा मैदानात आला नाही. तसेच पाचव्या कसोटीतही त्याला खेळता आलं नाही. अशातच आता आशियाई चषक आणि वेस्ट इंडिजविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेलाही तो मुकणार असल्याच वृत्त समोर आलं आहे.
मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर 23 ते 27 जुलै दरम्यान चौथा कसोटी सामना खेळला गेला. या सामन्यात फलंदाजी करत असताना क्रिस वोक्सच्या गोलंदाजीवर ऋषभ पंतला गंभीर दुखापत झाली होती. तेव्हा तो तत्काळ मैदानाबाहेरही गेला होता. या सामन्यात त्याने लंगडत लंगडत फलंदाजी केली मात्र यष्टीरक्षणासाठी तो मैदानात उतरला नाही. त्याला जवळपास सहा आठवड्यांची विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. असे असतानाच आता नवीन माहिती समोर आली असून 9 सप्टेंबर पासून सुरू होणाऱ्या आशियाई चषकामध्ये ऋषभ पंत खेळणार नाहीये. त्याचबरोबर वेस्ट इंडिजविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेतूनही तो बाहेर होणार असल्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये 2 ऑक्टोबरपासून दोन सामन्यांची कसोटी मालिका हिंदुस्थानात खेळली जाणार आहे.
सिराजला कामगिरीचे संपूर्ण श्रेय मिळालेच नाही, सचिन तेंडुलकरकडून मॅचविनरला शाबासकी
इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चार सामन्यांमध्ये त्याने दमदार खेळाचं प्रदर्शन केलं. त्याने चार कसोटींमधील 7 डावांमध्ये फलंदाजी करताना 68.42 च्या सरासरीने 479 धावा केल्या. या धावांमध्ये 2 शतकांचा आणि 3 अर्धशतकांचा समावेश आहे.