
कार अपघातात गंभीर जखमी झालेला क्रिकेटपटू ऋषभ पंत वन डे वर्ल्ड कप खेळू शकला नव्हता. मात्र तो फिट झाला तर आगामी टी-20 वर्ल्ड कपमध्ये नक्कीच दिसेल, असा विश्वास बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी व्यक्त केला आहे. पंतच्या फिटनेसबाबत बीसीसीआय सर्व अपडेट वेळोवेळी घेत आहे. बंगळुरूची राष्ट्रीय अकादमीच (एनसीए) पंतबाबत निर्णय घेणार असून त्याच्यासाठी हिंदुस्थानी संघाचे दरवाजे खुले आहेत. आम्ही त्याच्या फिटनेसबाबत उत्सुक आहोत. एनसीएकडून हिरवा कंदिल मिळताच तो संघात आणि वर्ल्ड कपमध्ये खेळताना दिसेल. पंतची फिटनेस आमच्यासाठी खूप मोठी बाब असल्याचेही शहा म्हणाले.





























































