माझ्या बायकोचे नाव ‘जेनेलिया’ नाही; रितेशच्या ट्विटची होतेय चर्चा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जिनिलिया डिसुझा- देशमुख हे बॉलिवूडमधले सर्वात क्युट कपल्स म्हणून ओळखले जातात. ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटापासून त्यांच्या लव्हस्टोरीला सुरुवात झाली. लग्नाच्या इतक्या वर्षांनंतरही या दोघांचे प्रेम तसेच आहे. त्यांच्या सोशल मीडियावरील फोटो, व्हिडिओवर चाहत्यांचा लाईक्सचा अक्षरशः वर्षाव होतो. आता जिनिलियाच्या वाढदिवसानिमित्त रितेश देशमुखने केलेले एक ट्विट चर्चेत आले आहे. त्याने एक खास गोष्ट चाहत्यांना सांगितली आहे. रितेशने एक ट्विट करत ‘‘माझ्या बायकोचे नाव ‘जिनिलिया’ आहे, जेनेलिया नाही,’’ असे सांगितले आहे. तसेच रितेशने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर व्हिडिओ शेयर करत पत्नी जिनिलियाला वाढदिवसाच्या खास अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. अनेक चाहत्यांनी आणि कलाकारांनीसुद्धा कमेंट्स करत तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.