ऋतुराज गायकवाड काऊंटी क्रिकेट खेळणार!

महाराष्ट्राचा स्टार क्रिकेटपटू आता काऊंटी क्रिकेटही खेळताना दिसणार आहे. त्याने यॉर्कशायर या प्रसिद्ध काऊंटी क्लबशी करार केलाय. यंदाच्या हंगामातील वन डे वर्ल्ड कपपर्यंतच ऋतुराज हिंदुस्थानी संघासोबत राहील. त्याला इंग्लंड दौऱ्यावरील हिंदुस्थान ‘अ’ संघात स्थान मिळाले होते, मात्र इंग्लंड लायन्सविरुद्धच्या दोन अनधिकृत कसोटी सामन्यात त्याला अंतिम अकरामध्ये संधी मिळाली नाही.

ऋतुराज गायकवाड कारकिर्दीत प्रथम काऊंटी क्रिकेट खेळणार आहे. जुलैमध्ये सरेविरुद्धच्या सामन्याने तो इंग्लंडमधील या स्थानिक क्रिकेट स्पर्धेत खेळेल. आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाचा कर्णधार असलेला ऋतुराज 10 एप्रिलला जायबंदी झाला व उर्वरित आयपीएलला मुकला. त्याने 8 एप्रिलला अखेरचा आयपीएल सामना खेळला होता.

‘मी काऊंटी क्रिकेटमध्ये खेळण्यास उत्सुक आहे. इंग्लंडमधील स्थानिक क्रिकेटमध्ये खेळण्याची माझी इच्छा होती. त्यात यॉर्कशायरसारखा क्लब मिळाला. मी वन डे कपमध्येही या क्लबला चॅम्पियन बनविण्यासाठी सर्वस्व पणाला लावीन.’

n  ऋतुराज गायकवाड