लातूरच्या चापोलीत ट्रक मोटारसायकलचा अपघात; एकाचा मृत्यू

1119

चापोली येथील लातूर- नांदेड राष्ट्रीय महामार्गवर प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ मोटर सायकल आणि ट्रकच्या अपघातांमध्ये एकाचा मृत्यू झाला. मोटारसायकल आणि ट्रकची धडक होऊन त्यात मोटारसायकलस्वार हाकानी फरिदसाब कुबडे (20) हा गंभीर जखमी झाला होता. त्यांच्यावर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे डॉ. धनंजय सावंत यांनी प्राथमिक उपचार करुन ग्रामीण रुग्णालय चाकूर येथे पुढील उपचारासाठी पाठवले होते. त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकच्या ताब्यात देण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक जयवंत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस जमादार मारोती तुडमे , पोकॉ माधव सारोळे करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या