मुंबई-गोवा महामार्गावर कर्नाळ्यात खचला; चार तास वाहतुक कोंडी

52

सामना प्रतिनिधी । पेण

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कर्नाळा हद्दीत सांडपाणी जायला मोरी नसल्याने सर्व पाणी महामार्गावर आले. पाण्याच्या प्रवाहामुळे रस्ता खचल्याने वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सुमारे चारतास महामार्गावर वाहतुक कोंडी झाली होती.

सोमवारी आठवड्याचा पहिला दिवस असल्याने अनेक कामगार आणि विकेंडला गेलेल्या मुंबईकराचे मात्र यामुळे प्रचंड हाल झाले आहेत. दरम्यान नवीन पनवेल पोलीस ठाण्याचे कर्मचारी या मार्गावरील ट्रॅफिक कंट्रोल करत आहेत, अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव यांनी दिली. पोलिसांनी व स्थानिकांनी गाड्या पर्यायी मार्गाने वळविल्याने वाहतूक सुरळीत झाली.

आपली प्रतिक्रिया द्या