
संगमेश्वर तालुक्यातील साखरपा भंडारवाडीतील काजळी नदीच्या लगत असणारा अंतर्गत रस्ता पावसाने वाहून गेला आहे. सोमवारी काजळी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने अनेक कालवे पाण्याखाली गेले आहेत. त्यातच नदीचे पाणी रस्त्यावर आल्याने साखरपा भंडारवाडीतील रस्ता पाण्याने वाहून गेला आहे. मात्र पर्यायी रस्ता असल्याने वाहतुकीची समस्या आलेली नाही.