
सामना प्रतिनिधी । मालवण
वायरी भूतनाथ येथील रेकोबा हायस्कुल ते वराडकरवाडी रस्त्याच्या डांबरीकरण कामाचा शुभारंभ शिवसेना तालुकाप्रमुख जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर यांच्या उपस्थितीत दत्ताराम लुडबे यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच माड्ये पाणंद येथील मोरीच्या नुतनीकरण कामाचा शुभारंभ प्रियांका रेवंडकर यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी वायरी भूतनाथचे सरपंच घनश्याम ढोके, उपसरपंच संदेश तळगावकर, विभागप्रमुख प्रवीण लुडबे, शाखाप्रमुख जयवंत लुडबे, महिला विभाग प्रमुख प्रियांका रेवंडकर, ग्रा. प. सदस्य मुन्ना झाड, सौ. शिला लुडबे, सौ. माधुरी खोबरेकर, ललित वराडकर, राजन लुडबे, आपा लुडबे, माजी ग्रा. प. सदस्य संजय हंजनकर, प्रवीण रेवंडकर, भगवान लुडबे, राजु लुडबे, दत्ताराम लुडबे, अक्षय हंजनकर, गणेश प्रभुलकर, प्रसाद आडवणकर, साईनाथ जेठे, अरुण तळगावकर, अरुण लुडबे, प्रल्हाद तळगावकर, बाळा हंजनकर, बाळा देऊलकर, दाजी म्हसकर, उमेश चव्हाण, महेश गोलतकर, कमलाकर चव्हाण, जतीन माणगावकर, दाजी जोशी आदी व इतर उपस्थित होते.
जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत रेकोबा हायस्कुल ते वराडकरवाडी रस्ता डांबरीकरणासाठी आमदार वैभव नाईक आणि शिवसेना तालुकाप्रमुख तथा जि. प. सदस्य हरी खोबरेकर यांच्या प्रयत्नातून ६ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला.
वायरी भूतनाथ येथीलच माडये पाणंद परिसर येथे पावसाळ्याच्या दिवसांत मोठ्या प्रमाणात पाणी साचते. यासाठी येथील मोरीची दुरुस्ती व नूतनीकरण करणे गरजेचे होते. त्यामुळे १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून मंजूर झालेल्या मोरीच्या नूतनीकरणाच्या कामामुळे याठिकाणी पाणी साचून राहणार नाही. या कामाबाबत ग्रामस्थांनी आम. वैभव नाईक, जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर यांचे आभार मानले.

































































