उदगीर येथे पाच बंद घरे फोडली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । लातूर

जिल्ह्यात बंद असणारे घर फोडण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. उदगीर येथे चोरट्यांनी पाच घरे फोडून सुमारे ३ लाख ३१ हजार रुपयांचा मुद्देमाल पळवला आहे.

उदगीर येथील पारकट्टे गल्लीमध्ये राहणाऱ्या नागनाथ गुरुनाथ स्वामी यांनी चोरीची तक्रार दिली. फिर्यादी व त्यांच्या वाड्यातील लोक कुटुंबासह देवदर्शनासाठी घरास कुलुप लाऊन गेले होते. अज्ञात चोरट्यांनी फिर्यादी व त्यांच्या वाड्यातील लोकांच्या घरांचे कुलूप तोडून सोन्या चांदीचे दागीने आणि रोख रक्कम असा सुमारे ३ लाख ३१ हजार रुपयांचा मुद्देमाल पळवला. नागनाथ गुरुनाथ स्वामी भुंगा, रमेश बस्वराज स्वामी भुंगा, काशिबाई शिवराज स्वामी भुंगा, शिवराज वैजनाथ स्वामी भुंगा या चारजणांच्या घरांचा यामध्ये समावेश होता.

देगलूर रोडवरील मनोहर गायकवाड हे त्यांच्या घराला कुलूप लाऊन पुण्यतिथीला निडेबन येथे गेले होते. अज्ञात चोरट्यांनी त्यांचे घर फोडून कपाटातील सोन्याचे मिनीगंठण, रोख ५ हजार असा एकूण ३० हजार रुपयांचा मुद्देमाल पळवण्यात आला. उदगीर ग्रामिण पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.