पाच वर्षे मानसिक छळ केला तरीही माझेच नाव पुन्हा घेतायेत- रॉबर्ट वढेरांची मोदींवर टीका

42
robert-vadra

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी गरिबी, बेरोजगारीसारख्या मुद्दय़ांवर भाष्य न करता त्यांच्या प्रचारसभांमधून ज्याप्रकारे टीका करतात ते पाहून आश्चर्याचा धक्का बसला आहे. आदरणीय प्रधानमंत्रीrजी, स्वत:चे अपयश लपविण्यासाठी आपल्यावर व्यक्तिगत हल्ले करणे बंद करा, असे जाहीर आवाहनही वढेरा यांनी केले आहे.

गेल्या पाच कर्षांत आपला प्रचंड मानसिक छळ करण्यात आला. तपास यंत्रणा, न्यायालय आणि कर विभागाकडून फक्त मानसिक दबाव टाकण्यासाठी वारंवार नोटीस पाठवण्यात येत आहेत. या सर्व आदेशांचे पालन करण्यात आले, पण माझ्याविरोधात एकही आरोप सिद्ध झालेला नाही. तरीदेखील निवडणुकीच्या निमित्ताने आपल्या नावाचा वारंवार वापर सरकारचे अपयश झाकण्यासाठी होत असल्याचे काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वढेरा यांनी फेसबुकच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या