कोरोनाला मारणारा रोबो, अवघ्या अर्धा तासांत 4 हजार फूट जागा करणार विषाणूमुक्त

कोरोना विरोधाच्या लढाईत आता रोबोदेखील सामील होणार आहे. देशातील अग्रगण्य शिक्षण संस्था एमआयटीने यासाठी एक विशेष रोबोची निर्मिती केली असून हा रोबो चक्क अर्धा तासांत तब्बल 4 हजार वर्ग फूट इतकी जागा विषाणू मुक्त करणार आहे. शाळा, मॉल्स, सुपर मार्केट इत्यादी ठिकाणी या रोबोचा वापर करता येऊ शकतो.

एमआयटी विद्यापीठाच्या कॉम्प्युटर सायन्स ऍण्ड आर्टिफिशियल इंटेलिजेंस विभाग आणि ग्रेटर बॉस्टनच्या मदतीने या रोबो तयार करण्यात आला आहे. हा रोबो कस्टम यु व्हीच्या लाईटचा वापर करून जागा विषाणूमुक्त करण्यास मदत करतो. त्याशिवाय हवेतील कोरोना विषाणूला देखील नाहीसे करते.

आपली प्रतिक्रिया द्या