इजिप्तमध्ये कोरोना टेस्ट करणारा रोबो; इसीजी- रक्त तपासणीतही करतो मदत

सीरो 3 त्याचा चेहरा आणि हात माणसासारखेच… तो रक्त तपासणी, इसीजी ही कामे अगदी सफाईदारपणे करतो. आता तो कोरोना काळात रुग्णांच्या मदतीला येण्याच्या तयारीत आहे. इजिप्तमध्ये माणसासारखा दिसणारा रोबो निर्माण करण्यात आला आहे. सीरा -03 असे या रोबोला संशोधकाने नाव दिले आहे.

रेस्टॉरंटमध्ये चहा कॉफी बनवून तो ग्राहकांना देणारा, तर कधी किचकट शस्त्रक्रिया सोप्या करून माणसाला जीवदान देणारा रोबो अशा अनेक बातम्या आपण नेहमी वाचत असतो. असाच मानवाला उपयोगी ठरणारा एक रोबो इजिप्तमध्ये तयार करण्यात आला आहे, की जो रुग्णांची कोविड -19 टेस्ट करू शकतो. इतकेच नाही तर हा रोबो शरीराचे तापमानही मोजतो आणि जर मास्क घातले नसेल तर मास्क घालण्याच्या सूचनाही करतो. कोविड टेस्टच्या व्यतिरिक्त इसीजी, ब्लड टेस्ट आणि एक्सरे काढण्याचे कामही त्याच्याकडून केले जाते. या टेस्टचा रिपोर्ट रोबोत बसविण्यात आलेल्या स्क्रिनवर पाहता येतो.

या रोबोला इजिप्तच्या उत्तरेकडील काहिरा येथील एका खासगी रुग्णालयात बनविण्यात आले आहे. या रोबोची निर्मिती मेहमूद अल कौमी यांनी केली असून हा रोबो कोरोना आटोक्यात आणण्यास मदत करू शकेल असे त्यांचे म्हणणे आहे. रोबोला पाहून कुणीही घाबरू नये म्हणून याची रचनाच एखाद्या मानवी देहासारखी करण्यात आली आहे. सध्या काहिरा येथील एका रुग्णालयात या रोबोकडून शरीराचे तापमान तपासण्याचे काम करण्यात येत आहे. तसेच हा रोबो कोरोनाची टेस्ट करण्यास फायदेशीर ठरू शकेल, असे रुग्णालयाचे मुख्य अबु बक्र अल मिही यांचे म्हणणे आहे.

बँक, विमानतळ, रेल्वे स्थानक अशा गर्दीच्या ठिकाणी या रोबोला तपासणीसाठी आपण ठेवू शकतो. रिमोटच्या सहाय्याने दूरवरून एकच व्यक्ती या रोबोला हाताळू शकते त्यामुळे कोरोनाचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी मदत होऊ शकते, असे संशोधकाचे म्हणणे आहे.

आपली प्रतिक्रिया द्या