सावधान! रोहिंग्या केरळकडे प्रवास करताहेत, रेल्वेचं अधिकाऱ्यांना पत्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

रोहिंग्यांचा प्रश्न अद्यापही सुटलेला नसून काही रोहिंग्या हे ईशान्य हिंदुस्थानातून केरळकडे म्हणजे हिंदुस्थानच्या दक्षिणेकडील राज्यांच्या दिशेने प्रवास करत असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांना प्रशासनाकडून कळवण्यात आले आहे. रेल्वेत ते आढळल्यास त्यांना पोलिसांच्या स्वाधिन करा, असे आदेश देण्यात आले आहेत.

संसदेच्या सभागृहात रोहिंग्यांच्या प्रश्नावरून केंद्राने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांना हिंदुस्थानात पसरू देणार नाही, असंही सांगितलं आहे. मात्र तरी मिळालेल्या माहितीनुसार हे लोक आपली कुटुंब सोबत घेऊन दक्षिणेकडे जाणाऱ्या रेल्वेमधून प्रवास करत असल्याची माहिती कळाली आहे. तेव्हा त्यांना वेळीच रोखण्यासाठी अधिकाऱ्यांना तशा सूचाना रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. संबंधित विभागीय अधिकाऱ्यांना प्रशासनाकडून तशी पत्र देण्यात आली असून खबरदारी घेण्यास सांगितले आहे. तसेच रेल्वे गाड्यांचे क्रमांक आणि नावांचा उल्लेख देखील या पत्रात केल्याचे आढळते.