चित्रपट अभिनेत्री अपघातात जबर जखमी

1087

रोहिणी सिंह नावाची अभिनेत्री रस्ते अपघातात जबर जखमी झाली आहे. तिला अनेक ठिकाणी फ्रॅक्चर झाल्याचेही कळाले आहे. अभिनेत्रीसोबत गाडीतून प्रवास करणारी तिची मैत्रिण अर्पिता ही देखील जखमी झाली आहे.

‘डीडीएलजे’मधील मध्य रेल्वेचे आपटा स्थानक सुपरहिट

अर्पिता ही अभिनेता जय जगदीश याची मुलगी आहे. या दोघीजणी वाढदिवसाच्या पार्टीवरून परतत होत्या. गुरुवारी रात्री हा प्रकार घडला असून गाडीच्या पुढच्या भागाचा चेंदामेंदा झाला आहे.

सुशांतचं कुटुंब रियाविरुद्ध साक्ष देण्यासाठी दबाव टाकतंय, मित्राने केला गंभीर आरोप

बंगळुरूतील मावल्लीपुराजवळ हा अपघात झाला आहे. अपघातानंतर दोघींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आलं असून या दोघींची प्रकृती आता चांगली असल्याचं सांगण्यात आलं आहे. या दोघींना आठवडाभरात घरी सोडण्यात येईल असंही सांगितलं.

actress-rohini-singh-rishik

या दोघींचा मित्र गाडी चालवत होता आणि त्याचा गाडीवरचा ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. रोहिणी सिंह उर्फ रिषिका ही दिग्दर्शक राजेंद्र बाबू यांची मुलगी असून तिचा भाऊ आदित्य हा कन्नड चित्रपटांमधील अभिनेता आहे. 2011 साली रोहिणीने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते.

आपली प्रतिक्रिया द्या