रोहित सिंगच्या लग्नात कोण कोण होते ते सांगा, रोहित पवारांचा प्रफुल्ल पटेलांना सवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एसआरच्या विमानामध्ये दादा प्रवास करत असताना विमान हे पाडण्यात आलं का पडलं, हा माझा साधा सोपा प्रश्न आहे असे विधान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केले. तसेच रोहित सिंगच्या लग्नात कोण कोण होते ते सांगा असा थेट सवाल रोहित पवार यांनी प्रफुल्ल पटेल यांना विचारला आहे.

दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत रोहित पवार म्हणाले की, जे मी बोलतोय याचा पुरावा सीआयडी हे सीडीआर रिपोर्ट हे विके सिंगचे काढून त्याच्यात काय संभाषण झाले हे सुद्धा त्या ठिकाणी काढता येईल. तुम्ही एक समजून घ्या, हा जो पायलट कपूर आहे, हा पायलट पूर्वी दारू प्यायचा वगैरे. हे सगळे पुरावे आम्ही तिथे दिलेले आहेत. पण आम्हाला जी माहिती मिळालेली आहे की अजित दादांचं विमान उडवत असताना त्यांच्या रक्तात कुठेही दारू नव्हती, ड्रग नव्हतं आणि विषही नव्हतं. त्यामुळे हे जे काही आम्हाला कळालं आहे ते कदाचित उद्या जाऊन तपास यंत्रणा स्पष्टपणे तिथे सांगतील.

मग दारू न पिता सुद्धा हा जो कपूर आहे त्याने जे काही केलं असेल ते का केलं असेल? तर या सगळ्या गोष्टींच्या खोलामध्ये आपल्याला जावं लागेल. दबाव होता का आणि के. सिंगला का तिथे वाचवलं जातंय असा सुद्धा आम्हाला प्रश्न आहे. एक आहे की मी सातत्याने सांगतोय की मला के. सिंग आणि व्हीएसआरचं काही घेणंदेणं नाही. पण एसआरच्या विमानामध्ये दादा प्रवास करत असताना विमान हे पाडण्यात आलं का पडलं, हा माझा साधा सोपा प्रश्न आहे.

मग के. सिंगचा तपास ज्या दिशेने चाललाय, आम्हाला कुठेतरी वाटतं की सिंग आणि व्हीएसआरला वाचवलं जातंय का? कारण के. सिंगला जर धरलं, के. सिंगला जर ताब्यात घेतलं तर के. सिंग काही लोकांची नावं घेईल. म्हणून कुठेतरी काही लोकांना भीती वाटते असं आम्हाला वाटतं. आता एक तुम्ही समजून घ्या की त्याच्या मुलाच्या लग्नामध्ये कुणी जाऊ शकते, हे मी समजू शकतो. पण आज जे सत्तेत आहेत ते लोक जर रोहित सिंगच्या लग्नात गेले असतील, तिथे लग्नामध्ये आहुजा नावाचा जो सिंगर आहे — काही दिवसांपूर्वी तुम्ही बघितलं असेल पुणे आणि मुंबईमध्ये जेव्हा तो आला होता तेव्हा तो व्हीएसआरच्याच विमानाने आला होता.

रोहित सिंगच्या लग्नामध्ये आहुजा गाणं गात असताना त्या ठिकाणी प्रफुल्ल पटेल तर होतेच. त्याच्याबरोबर त्यांचा मित्र असणार जे एस. एन. शर्मा का काहीतरी त्याचं नाव आहे तो सुद्धा त्या पार्टीला, नाहीतर त्या लग्नाला होता. आणि त्या लग्नाला अजून मोठे मोठे नेते तिथे होते. मी प्रफुल्ल पाटलांना त्या ठिकाणी विनंती केलेली आहे की तुम्ही जर अजित दादांचे एवढे जवळ असाल आणि तुम्ही त्या पार्टीला, त्या लग्नाला होताच, पण लोकांसमोर येऊन जरा नाव तर सांगा की त्या पार्टीमध्ये त्या ठिकाणी कोण होतं. हे पार्टीमध्ये असणारे जे लोक आहेत ना ते इतके पावरफुल लोक आहेत आणि ते पावरफुल लोक जर रोहित सिंगच्या लग्नामध्ये तिथे जात असतील तर 100% कुठे ना कुठेतरी रोहित सिंग, व्ही के सिंग, व्हीएसआरला याच मोठ्या नेत्यांकडून वाचवलं जातं असं सिद्ध होतं.

विषय एवढाच आहे की आम्हाला जी माहिती कळते ती माहिती आम्हाला कधीतरी काही पत्रकारांकडून कळते. आमच्या काही एजन्सीज आहेत त्यांच्याकडून कळते. व्हीएसआरच्याच काही लोकांकडून आणि अजित दादांचे हितचिंतक जे लोक आहेत त्यांच्याकडून ती माहिती कळते. ही माहिती फक्त आम्ही तिथे पुढे आणतोय. त्याच्यावर शहानिशा करणं, रिसर्च करणं, इन्वेस्टिगेशन करणं हे सीआयडी काम आहे. एक तुम्ही समजून घ्या की कुठल्याही परिस्थितीमध्ये जर विजिबिलिटी 5000 च्या खाली असते तेव्हा कुठलाही कॅप्टन पायलट विमान उडवत नाही. मग कपूरला एवढी हिंमत आली कशी? तो पिला नव्हता हे आता कुठेतरी सिद्ध झालं आहे. ड्रग घेतले नव्हते हे तिथे रक्तातून सिद्ध झालेलं आहे. मग अशा पद्धतीने तेवढं धाडस कसं झालं? मग धाडस देणारा हा विके सिंग होता का, असाही साहजिकच त्या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो. एस. एन. शर्मा हा प्रफुल्ल पटेल यांच्या जवळ असणारा एकदम व्यक्ती आहे. तुम्ही थोडासा अभ्यास करा, तुम्हाला ते कळेल. प्रफुल्ल पटेल स्वतः रोहित सिंगच्या राजस्थानमध्ये जयपूरला झालेल्या लग्नामध्ये तिथे उपस्थित होते. तिथे गाणं गाणारा सुद्धा आहुजा होता, हे मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगतोय.

हनी सिंग तिथे लोकांना हाय-हॅलो करत हातामध्ये ग्लास घेऊन अशा पद्धतीच्या वातावरणामध्ये हे लोक रोहित सिंग, के सिंग यांच्या खांद्याला खांदा लावून मस्ती करत होते, मजा करत होते, शुभेच्छा त्या ठिकाणी देत होते. आणि हाच तो रोहित सिंग, हाच तो विके सिंग ज्यांची व्हीएसआर नावाची कंपनी जी 2023 ला एकनाथ शिंदे साहेबांना डावोसला घेऊन जात असताना खूप मोठी चूक त्यांच्या तिथे झाली होती. योगायोगाने आणि चांगल्या हेतूतून आपण असं समजूया की एकनाथ शिंदे साहेबांचा कुठे त्या ठिकाणी अपघात झाला नाही. पण मग हीच ती कंपनी, हाच तो के सिंग, हाच तो रोहित सिंग.

ही तिसरी कंपनी आहे ज्याच्या दादांच्या बाबतीत यामध्ये घातपात नाहीतर अपघात तिथे झालेला एवढा मोठा योगायोग होऊ शकतो का? उत्तर द्यायला पाहिजे. पण उत्तर दिलं जात नाही. संशय का वाढत चाललाय हे तुम्ही समजून घ्या. एक तर सीबीआयला देऊन 26 दिवस झाले तरी सुशांत सिंह राजपूतचा मुद्दा दोन दिवसात स्वीकारला जातो आणि अजित दादांचा तपास सीबीआय अजून स्वीकारत नाही. हा एक मुद्दा.

दुसरा मुद्दा असा आहे की जेव्हा केव्हा मी बोलतो तेव्हा एकनाथ शिंदे साहेबांचे सगळे नेते कुठेतरी पाठिंबा देत आहेत. बाकी लोक पाठिंबा देतात. अजित दादांचे काही आमदार अमोल मिटकरी सारखे हे पाठिंबा देतात. पण भाजपचे मोठे नेते आणि कार्यकर्ते मात्र त्या ठिकाणी मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहेत किंवा माझ्या विरोधात बोलत आहेत.

आता त्या लग्नाला कोण गेलं होतं अजून पुढे जाऊन मी नाव सांगू शकतो. फक्त आमची इच्छा काय की पारदर्शक पद्धतीने हा तपास झाला पाहिजे. दुसरं म्हणजे एवढे सारे पुरावे असताना आणि तुम्ही डीजीसीएच्या अंतर्गत एक कारवाई करता कोणावर — व्हीएसआरवर. त्यांची काही लिअरजेट विमानं तुम्ही ग्राऊंड करता आणि त्यात असं म्हणता की नॉन-कम्प्लायन्स होता. मग विमान उडवणाऱ्या कंपनीमध्ये जर एवढा मोठा नॉन-कम्प्लायन्स असेल तर ती कंपनीच बंद झाली पाहिजे.

मग तुम्ही काही विमानं बंद पाडता आणि बाकीची उडवता. मग त्याच्या मागे का? ती विमानं कोणाची आहेत असा प्रश्न निर्माण होतो. एफआयआर करण्याचा प्रयत्न आम्ही करतो, पण आमचा एफआयआर सुद्धा तिथे घेतला जात नाही. मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये आमचा पीआय एफआयआर घेत होता. टायपिंग सुरू झाली होती, आमचं स्टेटमेंट घेतलं जात होतं. त्याचवेळी वरून एक मोठा अधिकारी तिथे आला आणि ते सगळं थांबवलं. त्या अधिकाऱ्याला कोणीतरी फोन करून प्रेशर टाकलं होतं.

मग अशा पद्धतीने सीआयडीवर जर प्रेशर टाकलं गेलं तर मग इन्वेस्टिगेशन नीट कसं होणार? माझं म्हणणं आहे की इन्वेस्टिगेशन तर दूर राहिलं, साधा आमचा एफआयआर सुद्धा घेतला जात नाही ही दुर्दैवी गोष्ट आहे. त्याचबरोबर या देशाचे एव्हिएशन मंत्री राम मोहन नायडू आहेत. आता ही एक गोष्ट मी आपल्या सर्वांसमोर आणतोय आणि त्याच्यात आमच्याकडे उद्या जाऊन पुरावे सुद्धा देऊ.

आम्हाला जे कळालेलं आहे की चंद्रबाबू नायडू हे स्वतः रोहित सिंगच्या लग्नाला नोव्हेंबर 2024 ला गेले होते. आणि चंद्रबाबू नायडू बरोबर राम मोहन नायडू हे सुद्धा होते. राम मोहन नायडू हे या देशाचे एव्हिएशन मंत्री आहेत आणि त्यांच्या मंत्रालयाच्या अंतर्गत एआयबी ही तपास यंत्रणा येते. एआयबीवर दुसऱ्या कोणाचा अधिकार नसतो, डायरेक्ट मंत्र्यांचा अधिकार असतो. मग तुमचे व्हीएसआरबरोबर आर्थिक संबंध आहेत, व्यक्तिगत संबंध आहेत, तर तपासावर परिणाम होऊ शकतो का हा प्रश्न निर्माण होतो.

व्हीएसआरला ज्या दिवशी एक मोठी बँक 40 कोटी रुपयांचा निधी देते, त्याच दिवशी चंद्रबाबू नायडू यांच्या एका एनबीएफसीला 50 कोटी रुपये दिले जातात. किती अजून योगायोग आणायचे? हे सगळे संबंध असल्यामुळे अजित दादांना न्याय मिळत नाही आणि इन्वेस्टिगेशन योग्य दिशेने जात नाही असं आमचं ठाम मत आहे.

मुंबईमध्ये जेव्हा प्रेस कॉन्फरन्स झाली होती तेव्हा आम्ही एक ऑडिओ दिला होता. त्या ऑडिओमध्ये के सिंगचा वकील बोलताना म्हणतो — “उस पायलटने ठोक दिया”. त्याचबरोबर माळी कुटुंब स्वतःच्या मुलीला न्याय मिळावा आणि खास करून अजित दादांना न्याय मिळावा म्हणून प्रयत्न करत आहे. त्यांच्या आईची तब्येत बरी नाही, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पण त्यांच्यावर सुद्धा दबाव आणला जातोय अशी माहिती आम्हाला मिळते.

व्ही के सिंग सीआयडीकडे जात असताना ए.के.-47 घेऊन जाणारा माणूस आहे असं सांगितलं जातं. म्हणजे किती प्रभावशाली माणूस असेल तुम्ही विचार करा. जर अशा व्यक्तीला वाचवलं जात असेल तर मग इन्वेस्टिगेशन योग्य दिशेने जाईल असं आम्हाला दुर्दैवाने वाटत नाही. सीआयडीमधील अधिकारी चांगले आहेत, ते वाईट आहेत असं मी म्हणणार नाही. ते महाराष्ट्र पोलीस दलाचे अधिकारी आहेत आणि त्यांच्यावर आमचा विश्वास आहे. पण जर वरून दबाव टाकला गेला तर तपासावर परिणाम होऊ शकतो.

आम्ही या प्रकरणात न्याय मिळावा म्हणून देशभरातील नेत्यांना भेटत आहोत. समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांची आम्ही भेट घेतली. त्यांनी वेळ दिला. त्यांना उत्तर प्रदेशमध्ये कार्यक्रम असल्यामुळे जास्त वेळ देता आला नाही, पण त्यांनी माहिती घेतली. त्यांनी त्यांच्या काही खासदारांना आम्हाला भेटायला सांगितलं आहे. आम्ही त्यांना सर्व माहिती देणार आहोत आणि त्यावर रिसर्च करून संसदेत हा मुद्दा मांडला जाईल. त्याचबरोबर आम्ही कनीमोळी मॅडमना भेटणार आहोत. काही दिवसांनी आम्ही झारखंडला जाऊन सोरेन साहेबांना भेटणार आहोत. राहुल गांधी यांची वेळ मागितली आहे. लवकरच भेट होईल अशी अपेक्षा आहे. तसेच ममता बॅनर्जी यांनाही आम्ही भेटणार आहोत. जोपर्यंत आम्ही सर्व नेत्यांना भेटत नाही तोपर्यंत आम्ही दिल्ली सोडणार नाही. अजित दादांना न्याय मिळावा ही आमची भूमिका आहे असेही रोहित पवार म्हणाले.