
“मुंबईचा राजा” म्हणून क्रिकेट विश्वात रोहित शर्माला ओळखलं जातं. चाहत्यांसोबत हसत खेळत वावरणाऱ्या रोहित शर्माचे जगभरात चाहते आहेत. सध्या रोहित मुंबईमध्ये जोरदार सराव करत आहे. शुक्रवारी (10 ऑक्टोबर) सुद्धा सरावासाठी छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे तो आला होते. नेट्समध्ये बराच वेळ त्याने प्रॅक्टीस केली आणि चौफेर फटकेबाजीही केली. त्याला पाहण्यासाठी चाहत्यांनी एकच गर्दी केली होती. याच दरम्यान त्याने एक फटका असा मारला की सर्वच पाहत राहिले. एका चाहत्याने याचा व्हिडीओ काढला असून तो आता व्हायरल होत आहे.
ट्वीटरवर (X) एका चाहत्याने व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओमध्ये रोहितने लेफ्ट साईडला खणखणीत शॉट मारला आहे. मात्र, शॉट मारला आणि चेंडू खाली पडल्यावर काच फुटल्याचा आवाज आला. त्यामुळे सर्वच आवाक झाले आणि त्याच्याच गाडीवर चेंडू पडल्याचं व्हिडीओ काढणारा म्हणाला. रोहितनेही चेंडू पडला त्या दिशेने इशारा केल्याच व्हिडीओमध्ये दिसत आहे. रोहितच्या नव्या कोऱ्या जवळपास चार कोटी किंमतीची लॅम्बॉर्गिनी उरूस गाडीवर चेंडू पडल्याच बोललं जात आहे.
— Ro³ (@45__rohan) October 10, 2025