रोहित शर्माचा नवा विक्रम; धोनीचा विक्रम मोडत बनला ‘सिक्सर किंग’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टिम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने आणिखी एक विक्रम रचला आहे. रोहितने न्यूझिलंड विरुद्धच्या हैदराबादमध्ये झालेल्या एकदिवसीय सामन्यात दमदार सुरुवात करत दोन सिक्सर टोलवले. या खेळीमुळे त्याने त्याच्या नावावर आणखी एका विक्रमाची नोंद केली आहे. या विक्रमामुळे हिंदुस्थानी मैदानांवर एकदिवसीय सामन्यात सर्वात जास्त सिक्सर करणारा खेळाडू म्हणून रोहित शर्माचा विक्रम झाला आहे.

रोहितने हा विक्रम करत माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा विक्रम मोडला आहे. न्यूझिलँडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात रोहितने हा विक्रम केला आहे. या सामन्यात रोहितने 38 चोंडूत 34 धावांची खेळी केली. यात त्याने 4 चौकार आणि 2 सिक्सर टोलवले. त्यामुळे हिंदुस्थानी मैदानावरील एखदिवसीय सामन्यात रोहित शर्माचे 125 सिक्सर झाले आहेत. या खेळीमुळे हिंदुस्थानी मैदानावर सर्वात जास्त सिक्सर लगावणारा खेळाडू ठरला आहे.

रोहितने महेंद्रसिंग धोनीचा 130 एकदिवसीय सामन्यात 123 सिक्सर मारण्याचा विक्रम मोडीत काढला आहे. आता या यादीत रोहित शर्मा अव्वल ठरला आहे. रोहित शर्मा 125, महेंद्रसिंग धोनी 123, सचिन तेंडूलकर 71, विराट कोहली 66 आणि युवराज सिंह 65 सिक्सर या खेळाडूंनी सर्वाधिक सिक्सरची खेळी केली आहे.

याचप्रमाणे एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक सिक्सर करणाऱ्यांमध्ये पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी अव्वल आहे. त्याने 398 एकदिवसीय सामन्यात 351 सिक्सर केले आहेत. तर रोहित शर्माने 239 एकदिवसीय सामन्यात 265 सिक्सर टोलवले असून तो चौथ्या स्थानावर आहे. तर धोनीने 229 सिक्सर केले आहेत.