दाढी, मिशा गेल्या अन ‘हिटमॅन’ रोहितची मुलगी झाली, वाचा कोणी घेतली ही फिरकी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टीम इंडियाचा फिरकीपटू युझवेंद्र चहलच्या मजेशीर स्वभावाचे अनेक किस्से आहेत. मैदानावर असो मैदानाबाहेर मिळेल तेव्हा मज्जा करायची संधी तो काय सोडत नाही. कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने क्रीडा स्पर्धाही होत नाहीये, त्यामुळे चहलच्या ‘डोक्यालिटी’ला अजूनच प्रेरणा मिळत आहे. नुकताच त्याने टीम इंडियाचा उपकर्णधार रोहित शर्मा याच्याशी पंगा घेत त्याला चक्क मुलगी बनवून टाकले आहे.

चहल याने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून एक फोटो शेअर केला आहे. रोहितचा मुलीच्या अवतारातला हा फोटो, असून चहल याने जेंडर स्वॅप नावाच्या एका ऍपच्या सहाय्याने हा कारणामा केला आहे. या ऍपवर त्याने रोहितचा फोटो टाकून फिल्टर वापरून त्याचे जेंडर चेंज केले आहे.

चहलने याच ऍपचा वापर करून रोहितच्या ओरिजिनल फोटोचे जेंडर चेंज केले आणि दोन्ही फोटो ट्विटरवर शेअर केले. ‘खूप सुंदर दिसतोय रोहिता शर्मा’, असे कॅप्शनही त्याने फोटोसोबत दिले आहे. तसेच रोहितला हा फोटो टॅग देखील केला. चाहत्यांनी यावर भन्नाट कमेंट केल्या आहेत, मात्र रोहितने अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही.