हिंदुस्थानच्या रौनकचा सलामीला विजय 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानच्या यजमान पदाखाली सुरू असलेल्या 44व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये आज हिंदुस्थानच्या रौनक साधवानीने संयुक्त अरब अमिरातीच्या अब्दुल रहमान एम याचा पराभव करीत हिंदुस्थान ‘ब’ संघाला शानदार सुरुवात करून दिली. नागपूरकर साधवानीने पांढऱया मोहऱया घेऊन यूएईच्या प्रतिस्पर्ध्याला सिसिलिअन बचाव पद्धतीचा अवलंब करीत 41व्या चालीत पराभूत केले. या ऐतिहासिक चेस ऑलिंपियाडमध्ये यजमान हिंदुस्थानचे 6 संघ सहभागी झाले असून यजमान म्हणून हिंदुस्थानला पदकप्राप्तीची सुवर्णसंधी आहे.