रोनाल्डोचा आठवावा प्रताप, आंतरराष्ट्रीय सामन्यात केली आठवी हॅटट्रिक

521

पोर्तुगालने यूईएफए यूरो चषक फुटबॉल स्पर्धेत लिथुआनिया संघाचा 5-1 गोल फरकाने धुव्वा उडवला. लिथुआनियामधील विलनियस शहरात झालेल्या या लढतीत स्टार फुटबॉलपटू रोनाल्डोने 4 गोल ठोकले. आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील त्याची ही आठवी हॅटट्रिक ठरली. क्लब स्पर्धेसह रोनाल्डोची ही 54 वी हॅटट्रिक ठरली.

पोर्तुगालने युरो चषक स्पर्धेत सलग दुसरा विजय मिळवला. सलामीच्या लढतीत त्यांनी सर्बियाला 4-2 गोल फरकाने हरवले होते. रोनाल्डोचा कारकिर्दीतील हा 93वा आंतरराष्ट्रीय गोल ठरला. त्याने पोर्तुगालच्या मागील 27 लढतीत 32 गोल केले आहेत. लिथुआनियाविरुद्ध रोनाल्डोने सातव्या मिनिटाला पेनल्टीवर पहिला गोल केला.

आपली प्रतिक्रिया द्या