एसी लोकलला गळती… प्रवाशांनी उघडल्या छत्र्या!

शुक्रवारच्या मुसळधार पावसात मध्य रेल्वे मार्गावर धावणाऱ्या एसी लोकलच्या छताला गळती लागली. एक-दोन नव्हे तर जागोजागी पावसाचे पाणी थेट लोकलच्या डब्यात झिरपू लागले. त्यामुळे प्रवाशांना ट्रेनमध्ये छत्र्या उघडून प्रवास करावा लागला. काही महिलांनी डोक्याला प्लॅस्टिक पिशवी गुंडाळून एसी लोकलच्या सीटवर बसणे पसंत केले.