
बंडगार्डन रस्त्यावर श्रीमान चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर सेतू दरम्यान मेट्रो स्थानकाचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे आजपासून पुढील दोन महिने परिसरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहे. वाहतूक बदल 16 जूनपर्यंत कायम राहणार आहे, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी दिली.
मोबाज चौकातून डॉ. आंबेडकर सेतूकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार आहे. तेथून जाणारी वाहतूक मंगलदास चौकातून मोबाज चौकातून उजवीकडे वळून मंगलदास रस्त्याने ब्ल्यू डायमंड चौक, कोरेगाव पार्क चौक, महात्मा गांधी चौक, डॉ. आंबेडकर सेतूमार्गे वळविण्यात आली आहे. पुणे स्थानकाकडून येणारी वाहने बोट क्लब रस्त्याकडे मोबाज चौकातून डावीकडे वळून ढोले पाटील रस्त्याने इच्छित स्थळी जातील. बोट क्लब रस्त्याने येणारी आणि येरवड्याकडे जाणारी वाहतूक श्रीमान चौकातून सरळ अमृतलाल मेहता रस्त्याने कोरेगाव पार्क चौकातून इच्छित स्थळी जातील. येरवड्यातून पुणे स्थानकाकडे जाणारी वाहतूक बंडगार्डन रस्त्यावर श्रीमान चौक, मोबाज चौकमार्गे सुरू राहणार आहे.



























































