हिंदुस्थानी मुस्लिमांवर अत्याचार झाले नाही, संघाचा दावा

604
suresh-bhaiyyaji-joshi

हिंदुस्थानात मुस्लिमांवर अत्याचार झाले नाही असे प्रतिपादन संघाचे महासचिव भैय्याजी जोशी यांनी केले आहे. तसेच नागरिकत्व सुधारित कायद्यावरून चुकीची माहिती पसरवली जात आहे, असेही त्यांनी सांगितले. 71 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त संघाच्या मुख्यालयात राष्ट्रध्वजा फडकावल्यानंतर ते बोलत होते.

भैय्याजी जोशी म्हणाले की, मुस्लिम समाजाच्या कुठल्याही व्यक्तीवर अत्याचार झालेले नाही. जर कुठल्याही देशातील व्यक्तीला हिंदुस्थानचे कायद्यान्वये नागरिकत्व मिळत असेल तर त्यात काय अडचण आहे असा सवाल जोशी यांनी विचारला. नागरिकत्व कायद्यावरून अफवा पसरवल्या जातात. जर हा कायदा लोकांना व्यवस्थित समजावला असता तर एवढ्या मोठ्या प्रमाणात विरोध झाला नसता असेही जोशी म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या