सरसंघचालक मोहन भागव यांच्या ट्विटरवरील ब्लू टीक गायब, इनअॅक्टीव्ह असल्याने कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सरसंघ चालक मोहन भागवत यांच्या ट्विटर खात्यावरील व्हेरिफाईड अकाऊंट दर्शवणारी ब्लू टीक हटवण्यात आली आहे. भागवत यांचे अकाऊंट इनअॅक्टीव्ह असल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू यांचे ट्विटर खात्यावरील ब्लू टिक शनिवारी गायब झाली होती. आता सरसंघचालक मोहन भागव यांचेही ट्विटर खात्यावरील ब्लू टीक गायब झाली आहे. नायडू यांच्या ट्विटर खात्यावरील ब्लू टीक गायब झाल्यानंतर गदारोळ माजला होता. पण नायडू यांच्या ट्विटर खात्यावरील ब्लू टीक परत झळकली आहे. नायडू यांचे खाते इनअॅक्टिव्ह असल्याने ही कारवाई केल्याचे ट्विटरने स्पष्ट केले होते. हाच नियम आता सरसंघचाल मोहन भागवत यांना लागू असल्याने त्यांच्या ट्विटर खात्यावरील ब्लू टीक हटवण्यात आली आहे. भागवतच नाही तर सुरेश सोनी, सुरेश जोशी आणि अरुण कुमार या संघातील वरिष्ठ नेत्यांच्याही ट्विटर खात्यावरील ब्लू टीक हटवण्यात आली आहे.

mohan-bhagwat-twitter

सरसंघचालक मोहन भागवत यांचे मे 2019 मध्ये ट्विटर खाते उघडले आहे. ट्विटरवर 2 लाखहून त्यांचे फॉलोअर असून त्यांनी केवळ संघाच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटला फॉलो केले आहे. भागवत यांच्या फॉलोअर्समध्ये अमित शहा, नितीन गडकरी आणि सुरेश प्रभू या भाजप नेत्यांच्या समावेश आहे.

भागवत यांनी ट्विटरवर खाते उघडल्यापासून एकदाही ट्विट केलेले नाही. संघाबाबत सगळी माहिती संघाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून दिली जाते. भागवत यांची भाषणे आणि भुमिकाही संघाच्याच सोशल मीडिया हँडलवरून दिली जाते. भागवत यांचे ट्विटर हँडल सक्रिय नसल्याने ब्लू टिक हटवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.