
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी राष्ट्रीय प्रवक्ते व ज्येष्ठ पत्रकार माधव गोविंद उपाख्य बाबुराव वैद्य यांचे निधन झाले आहे. वयाच्या 98 व्या वर्षी त्यांनी नागपूरमधील स्पंदन रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.
त्यांच्या पश्चात पत्नी सुनंदा, तीन मुली- विभावरी गिरीश नाईक, डॉ. प्रतिभा उदय राजहंस, भारती जयंत कहू, तसेच पाच मुलगे- धनंजय, डॉ. मनमोहन (सह सरकार्यवाह, रा. स्व. संघ), श्रीनिवास, शशिभूषण व डॉ. राम (हिंदू स्वयंसेवक संघ, सह संयोजक) व बराच मोठा आप्त परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा रविवार 20 डिसेंबर रोजी सकाळी 9.30 वाजता अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार होतील. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ स्वयंसेवक, जेष्ठ संपादक आणि विचारवंत मा. गो. उपाख्य बाबूराव वैद्य यांना माझी विनम्र श्रद्धांजली. पूज्य गुरुजी यांच्यासह सर्व सरसंघचालकांसोबत काम करण्याचे, त्यांना जवळून अनुभवण्याचे भाग्य बाबुरावांना लाभले होते.
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) December 19, 2020
































































