Amazon म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीचे दुसरे रुप, इन्फोसिस नंतर पांचजन्यची जेफ बेझोसवर टीका

इन्फोसिसवर टीका केल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ‘पांचजन्य’ साप्ताहिकात कॉमर्स कंपनी ऍमेझॉनवर टीका करण्यात आली आहे. जेफ बेझोस यांची ऍमेझॉन ही कंपनी दुसरी ईस्ट इंडिया कंपनी आहे. ऍमेझॉनने सरकारला कोट्यवधी रुपयांची लाच दिली असल्याचे लेखात म्हटले आहे.

3 ऑक्टोबर रोजी पांचजन्यचा ताजा अंक प्रकाशित होणार आहे. या अंकावर जेफ बेजोसचा फोटो असून ऍमेझॉन 2.0 असे शीर्षक देण्यात आले आहे.

पांचजन्यने आपल्या लेखात म्हटले आहे की, 18 व्या शतकात ईस्ट इंडिया कंपनीने हिंदुस्थाना आपल्या ताब्यात घेण्यासाठी जे जे प्रयत्न केले तेच प्रयत्न आज ऍमेझॉन करतना दिसत आहे. ऍमेझॉन देशात एकाधिकारशाही निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही लेखात केला आहे. इतकेच नाही पांचजन्यने ऍमेझॉन प्राईम व्हिडीओवरही टीका केली आहे. या ओटीटीवर असे हिंदुस्थान संस्कृतीविरोध असलेले कार्यक्रम प्रदर्शित केले जातात असे पांचजन्यने म्हटले आहे.

इन्फ़ोसिसवर टीका

आपली प्रतिक्रिया द्या