
‘एकदा का तुम्ही ओळख विसरलात की तुमच्यामध्ये इतर कितीही गुण असोत, त्यांना किंमत राहत नाही, असे सांगताना, ‘भारत हा ‘भारत’च राहायला हवा. भारत हा भारत आहे म्हणूनच मान आहे,’ असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले.’
‘भारत हे सर्वनाम आहे. त्याचा अनुवाद केला जाता कामा नये. इंडिया म्हणजे भारत हे खरे आहे, पण भारत हा भारत आहे. त्यामुळे व्यक्तिगत पातळीवर असेल किंवा सार्वजनिक ठिकाणी असेल, आपल्या बोलण्यात, लिहिण्यात ‘भारत’ असाच उल्लेख यायला हवा. एखाद्याचे नाव गोपाळ असेल तर इंग्रजीत बोलताना आपण त्याला ‘काउहर्ड’ म्हणत नाही. गोपाळ गोपाळच राहतो. त्यामुळे भारतही भारतच राहायला हवा, असे भागवत म्हणाले.